धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीच्या सरंपच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि. 8 मे 2026 रोजी दिलेल्या सुचनेनुसार सोडत पध्द्तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन दि.18 मे 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिवमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.
धाराशिव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीमध्ये दि.10 जुलै 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.सदर सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अनु.जाती,अनु. जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायत सरपंचपदामध्ये कोणतेही बदल न करता केवळ ना.मा.प्रवर्ग,व सर्वसाधारण या प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागा निश्चित करुन त्या-त्या प्रवर्गातील सरपंच पदाचे आरक्षण त्याच दिवशी सोडत पध्द्तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन निश्चित करण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील सर्व संबंधीतांनी उपरोक्त ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. मृणाल जाधव,तहसिलदार धाराशिव यांनी केले आहे.