धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजना व शासकीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदरील शिबिराच्या उदघाटन प्रसंगी विद्यापीठ उपपरिसर धाराशिवचे संचालक डॉ आर. बी. चौगुले, डॉ. विनोदकुमार वायचळ, जिल्हा समन्व्यक, डॉ. एन. पी. पाटील, डॉ. के. पी. हावळ यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये एकवीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये शासकीय रक्त केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील डॉ. राहुल आंधळे रक्तसंक्रमण अधिकारी, नामदेव मुंडे आधीपरिचारक, गणेश साळुंके जनसंपर्क अधिकारी, विष्णू गलांडे रक्तपेढी तंत्रज्ञ, पूजा दळवी- रक्तपेढी तंत्रज्ञ व रविराज गंभीरे रक्तपेढी सहाय्यक यांनी रक्त संकलणाचे कार्य पार पाडले. सदरील रक्तदान शिबिरामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच रोटरी क्लब धाराशिव येथील प्रदीप खामकर व अमोल माने, तसेच प्रा. डॉ. विनोदकुमार वायचळ आणि प्रा. डॉ. महेश्वर कळलावे यांनी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. के. पाटील, डॉ. जे. एस. शिंदे, डॉ. आर. एम. खोब्रागडे, तसेच रासेयो स्वयंसेवकानी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
डॉ. महेश्वर कळलावे यांचा विशेष सत्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव येथील शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. महेश्वर कळलावे यांनी आज 53 वे रक्तदान केले. या प्रसंगी त्यांचा प्रा. डॉ. आर. बी. चौगुले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रोटरीचे प्रदीप खामकर, अमोल माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
