परंडा (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टी “राष्ट्र प्रथम“ या विचार धारेवर आधारित असून भाजपा लीडर बेस नव्हे तर केडर बेस पार्टी असुन, कार्यकर्त्यांना सामाजिक जागरूकता, सेवाभाव आणि आपल्या कार्याची वैचारिक स्पष्टता यावी. हे या प्रशिक्षणाचे उद्दीष्ट असल्याचे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मत व्यक्त केले.

अ“पंडीत दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान“ अंतर्गत परंडा ग्रामीण व शहर मंडलाचे दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग तालुक्यातील चिंचपुर (बु.) येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या वर्गाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार ठाकूर हे बोलत होते.पक्षाच्या अंत्योदयाच्या धोरणानुसार केंद्र व राज्य सरकारच्या व्यक्तिगत व समुह लाभाच्या अनेक योजना असून त्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्याचे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, परंडा ग्रामीण मंडल अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे आणि शहर मंडल अध्यक्ष उमाकांत गोरे, भाजपा नेते गौतम लटके, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, वर्गाचे जिल्हा संयोजक दत्ता राजमाने, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, शिवाजीराव गिड्डे पाटील, सचिन घोडके, जयदेवबप्पा गोफणे, अनिल पाटील, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड आदी उपस्थित होते. 

पहिल्या सत्रात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ‌‘भारतीय जनता पार्टीचा इतिहास, विचारधारा व वाटचाल‌’ हा विषय अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मांडला. 

यावेळी योग प्रशिक्षक डॉ.आनंद मोरे शिवाजीराव गिड्डे, ॲड. जहीर चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अनिल पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे, ॲड. संतोष सूर्यवंशी, अस्मिताताई कांबळे, ॲड. गणेश खरसडे आदींनी मार्गदर्शन केले.  या द्विदिवसीय वर्गाचे सूत्रसंचालन निशिकांत क्षीरसागर यांनी केले. 


 
Top