धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महामंत्री पदी विद्यमान विद्यापीठ प्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे दि.28 व 29 मार्च दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्रीय संघटनमंत्री महेंद्र कपूर, सहसंघटन मंत्री लक्ष्मण, प्रांताचे पालक प्रा.डॉ. शेखर चंद्रात्रे, क्षेत्र प्रमुख दिग्विजय, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कार्यशाळेत प्रोफेसर दिलीप अर्जुने यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर राज्य महामंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी शैक्षणिक महासंघाचे विद्यापीठ महामंत्री डॉ. सत्यप्रेम घुमरे, महिला प्रमुख प्रा. डॉ. महानंदा दळवी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. संजय सांभाळकर, प्रसिद्धीप्रमुख प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे, जिल्हा महामंत्री डॉ. बालाजी माडजे, जालना जिल्हा महामंत्री डॉ. बाबू तोटरे , धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. नेताजी काळे, सचिव डॉ. निशांत निरमळे, बीड जिल्हाध्यक्ष रमेश लांडगे, यांच्यासह महाराष्ट्रातील शैक्षणिक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्ती बद्दल प्रोफेसर दिलीप अर्जुने यांचे अभिनंदन होत आहे.
