तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील ज्येष्ठ नागरिक इंदुबाई दिगंबर इंगळे (वय 85) यांचे शनिवार, दिनांक 18 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तुळजापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदुबाई इंगळे या तुळजाभवानी मंदिर येथील पुजारी विलास इंगळे यांच्या मातोश्री होत. तसेच त्या श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी संचालक कुमारी इंगळे यांच्या देखील मातोश्री होत्या. तसेच कैलासवासी दिगंबर इंगळे (पती) हे बाळासाहेब ठाकरे व ठाकरे घराण्याचे पारंपरिक पुजारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे इंगळे कुटुंबाला धार्मिक क्षेत्रात विशेष मानाचे स्थान आहे. इंदुबाई इंगळे यांच्यावर तुळजापूर येथील घाटशिळ रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुजारीवृंद, प्रतिष्ठित नागरिक, वकील, पत्रकार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, धार्मिक परंपरा जपणाऱ्या इंगळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनामुळे तुळजापूर शहरावर शोककळा पसरली असून, त्यांच्या कार्याची व योगदानाची आठवण कायम राहणार आहे.
