धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्व नागरिक, आर्थिकदृष्ट्या असक्षम, शेतकरी आणि कामगारांच्या कुटुंबियांसाठी बेंबळी (ता. धाराशिव) येथे ५ एप्रिलला मोफत नेत्र तपासणी व  मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाॅयन्स क्लब ऑफ लातूर सिटी, बेंबळी ग्राम विकास ट्रस्ट आणि उदयगिरी लाॅयन्स आय नेत्रालयाच्या (उदगीर) यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेंबळी येथील हेड्डा आडत दुकानाच्या हॉलमध्ये शिबिर सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. शिबिराचे उद्घाटन अरविंदअप्पा गिरवलकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी  गोविंदलाल हेड्डा असतील.   धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  शिबिरात उदयगिरी लाॅयन्स आय नेत्रालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे गरजू रुग्णांच्या डोळ्यांची  तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची निवड करून त्यांना उदगीर येथील नेत्रालयात नेले जाईल. विशेष म्हणजे, या रुग्णांना नेण्या-आणण्याची सेवा पूर्णपणे विनामूल्य पुरवण्यात येणार आहे. जगदीश हनुमानदासजी हेड्डा यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  शिबिरासाठी रुग्णांनी   डॉ. श्रीनिवास पवार, डॉ. अविनाश गावडे, डॉ. सचिन ताडेकर गणेश हेड्डा, उपेंद्र कटके, राजन गिरवलकर, श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

 
Top