भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परांडा विधानसभा मतदारसंघाच्या (SIR) BLA-1 विधानसभा प्रमुखपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली . या निवडीचे मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्याकडून अभिनंदन केले जात आहे . 

आगामी प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिये दरम्यान गैरप्रकार टाळला जावा, एकाच व्यक्तीचे अनेक ठिकाणी अनेक वेळेस मतदान होऊ नये यासाठी मतदार यादीची पूनरनिरीक्षण करण्याची पक्षाच्या माध्यमातून कार्यवाही चालू आहे . परंडा मतदार  संघात ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी पक्षातील ज्येष्ठ अनुभवी नेते बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडे पक्षश्रेष्ठी सोपवली आहे . बाळासाहेब क्षिरसागर यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते लालकृष्णजी अडवाणी, तत्कालीन केंद्रीय मंत्री  गोपीनाथजी मुंडे, तत्कालीन मुख्यमंत्री  मनोहरजी पर्रीकर यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबत काम करत पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे.  या नियुक्तीमुळे परांडा विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

दिनांक 29/3/ 2026 रोजी या निवडीचे तालुका  भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियाना दरम्यान सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील , महादेव वडेकर,  तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर महिला तालुका अध्यक्ष स्वाती तनपुरे , शहराध्यक्षा विद्या खामकर,  प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर,  जिल्हा परिषद माजी सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते, सिद्धार्थ जाधव , शुभम खामकर, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ,  बाजार समिती संचालक अंगद मुरूमकर, विकास जालन,  पंचायत समिती माजी सदस्य सिताराम वनवे ,  सुरेश उपरे,  सुबराव शिंदेसह असंख्य पदाधिकारी   कार्यकर्ते उपस्थित होते .


 
Top