तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा सोहळा बुधवार दिनांक एक रोजी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला  चैत्री पौर्णिमे पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक असे फुलांची आरस करण्यात आला होता. चैत्र पौर्णिमेचे मुख्य धार्मिक विधी बुधवारी (दि.1) रोजी संपन्न झाले.

चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहाटे 1 वा. चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास आरंभ झाला. पहाटे एक वाजल्यापासून तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वा.  देवीची भाविकांचे अभिषेक करण्यात आले ते 10 वाजता संपल्यानंतर देवीला वस्त्रालंकार घालुन नित्योपचार पूजा

केली गेली. सायंकाळी पुन्हा देवीजीस अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री 10 वा. मंदिर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांच्याकडून जोगवा होऊन चैत्र पौर्णिमा सोहळ्याची सांगता झाली.

 
Top