तुळजापूर (प्रतिनिधी)- या पुढील काळामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नूतन महासचिव अभिजीत चव्हाण यांनी केली. काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने त्यांचा महासचिव पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार केल्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री शिवराज मोरे, अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले व युवकांचे अशा स्थान माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानून चव्हाण म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील युवक युवतीचे बेरोजगारीचे प्रश्न लघुउद्योग विषयाचे प्रश्न सोडविण्यावर भर देणारा असून शेतमजूर महावितरण रस्ते पाणी आरोग्य घरकुल या विषयाच्या प्रश्नावर येणाऱ्या कालावधीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्याचे मार्गदर्शन घेऊन काँग्रेस वाढविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही देऊन त्यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सेवा दल काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवाजीराव गायकवाड, तालुका सेवा दल अध्यक्ष तानाजीराव जाधव, रसिक वाले, एडवोकेट रामचंद्र ढवळे, पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे,युवा कार्यकर्ते फरीद शेख इत्यादी उपस्थित होते.
