तुळजापूर (प्रतिनिधी)- तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार ॲट्रॉसिटी आणि शस्त्र अधिनियमाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शामसुंदर दयानंद इंगळे (वय 35 वर्षे, रा. मसला खुर्द. ता. तुळजापूर याचा नियमित जामीन अर्ज विशेष सत्र न्यायाधीश, धाराशिव यांनी मंजूर केला आहे.


बचाव पक्षाचा युक्तिवादः

सदर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट एम. बी. माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की. आरोपीवर लावलेले आरोप हे पुराव्याअभावी निराधार आहेत व सदर आरोपीस खोटया गुन्हयामध्ये गोवलेले असून प्राप्त पुराव्याच्या आधारे आणि तपासाच्या अनुषंगाने आरोपीला जामीन मिळणे न्यायोचित ठरेल.


न्यायालयाचा निर्णय:

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेऊन,विशेष सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपी शामसुंदर इंगळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. धर्मराज अजित सरडे आणि ॲड. विशाल बारकुल यांनीही कामकाज पाहिले. तसेच दिग्विजय वारे व स्वप्निल बोबडे यांनी सहकार्य केले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top