उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील आष्टा(जहागीर) येथे संतयोगी दामोदर मठ संस्थानचे मठाधिपती 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता किर्तनसेवा व दहिहंडी ने करुन हनुमान जयंती भक्ती मय वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी सायंकाळी 4 ते5 दरम्यान हणुमान मंदिर येथे 1008महंत अवधुतपुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन ठेवण्यात आले होते 1008 महंत अवधुतपुरी महाराज यांनी काल्याच्या किर्तनासाठी “उपजोनिया पुढती येवु/काला खावु दहीभात“ या काल्याच्या प्रसंगातील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग घेऊन उपस्थित भाविक भक्तांना संबोधुन अभंगाचे  निरुपण  करण्यात आले. तदनंतर 5:30वाजता दहिहंडी काल्याने हणुमान जयंतीचे सांगता  करण्यात आली.

यावेळी सरपंच सतिष जमादार, उपसरपंच बापुराव गायकवाड, माजी उपसरपंच राधाताई गायकवाड,पोलीस पाटिल महेश जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद सुयर्यवंशी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैष्णवी जाधव, माजी सैनिक र्वषीकेत जाधव,माजी शालेय समीतीचे सभापती अशोकराव गायकवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रविकुमार मुळे,माधव पाटील श्रीराम कुलकर्णी,,ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा.मोहनराव गायकवाड, भजनीमंडळाचे अध्यक्ष कमलाकर गायकवाड,जेष्ठ नागरिक अंबादास पाटील, हर्मोनियम वादक हिरानाथ गायकवाड, पखवाज वादक जयवंत (सोनाजी) जाधव,विणेकरी रमेश गायकवाड, पांडुरंग गायकवाड,गायनाचार्य उमेश जाधव, विश्वंभर जाधव,आशोक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, भगवान माने, नंदकुमार जाधव,युवानेते संभाजी गायकवाड, अनिल गायकवाड, शिवाजी गायकवाड, सचिन गायकवाड, विष्णू पाटील, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,किशोर जाधव,अदिसह भाविक भक्त गण समस्त ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना भोजन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 
Top