धाराशिव (प्रतिनिधी)- विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला.
तसेच शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. धाराशिव जिल्हयात दरोडा, घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल फोन चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्याबाबत मार्गदर्शन केले. धाराशिव जिल्ह्यातील उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस ठाणे येथे भेटी देवून मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत बैठका घेवून सुचन्या द्याव्यात. तसेच आगामी काळातील सण उत्सवा दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. सदर मिटींगला पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, परि. सपोअ मेघना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.