तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा सोहळा बुधवार दिनांक एक रोजी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला असला तरी भाविकांनी गुरुवारी चैत्री पौर्णिमा समजून लाखोच्या संख्येने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ गर्दी केली होती. गुरुवारी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आकर्षक असा फुलांचा आरास करण्यात आला होता. चैत्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक असे फुलांची आरास उद्योजक संजय कुमार मचे परिवार घोडेगाव, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी चैत्री पौर्णिमा निमित्त यांच्यावतीने आई तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा व मंदिर परिसर विविध प्रकारचे फुलांनी सजावट करण्यात आली होती.

चैत्र पौर्णिमेचे मुख्य धार्मिक विधी बुधवारी दि.1 एप्रिल रोजी संपन्न झाले. बुधवारी रात्री सिंह वाहनावर छबिना काढण्यात आला. त्यानंतर प्रक्षाळ पूजा होऊन महंत वाकोजी बुवा यांनी आपल्या उपरण्यात जोगवा मागितला. या जोगवा विधीने चैत्री पौर्णिमेच्या धार्मिक विधीचा सांगता झाला. गुरुवारी पहाटे 1 वा. चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास आरंभ झाला. पहाटे एक वाजल्यापासून तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वा.  देवीची भाविकांचे अभिषेक करण्यात आले ते 10 वाजता संपल्यानंतर देवीला वस्त्रालंकार घालुन, नित्योपचार पूजा केली गेली. सायंकाळी पुन्हा देवीजीस अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री 10 वा. मंदिर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. 

बुधवारच्या रात्री ते गुरुवारच्या पहाटे तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. या पावसात भाविकांचे मोठे हाल झाले. तसेच गुरुवारी रात्री देवी मंदिरात छबिना काढण्यात आला. त्यानंतर पक्षाळ पूजा करण्यात आली. शुक्रवार पेठ भागात भाविक मोठ्या संख्येने चैत्र पौर्णिमेनिमित्त येतात. मात्र याच भागात यात्रा नियोजनाबाबत कुठलाही नियोजन केल्याचे दिसून आले नाही. तसेच आज विजेचा लपंडाव ही सुरूच होता. आज लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन चैत्री पौर्णिमेची वारी अर्पण केली.


 
Top