धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी धाराशिव शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे संतोष राजेंद्र शिंदे, रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा यांने त्याचे साथीदारासह रात्री इंदापुर ते वाशी जाणारे रोडवरुन चालते पिकअपमधून तेलाचे डब्बे काढले आहेत. ते डब्बे संतोष राजेंद्र शिंदे याचे घरी लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा येथे आहेत असे सागिंतले. पथकाने नमुद आरोपीचा शोध घेत असताना तो येरमाळा येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे नमुद घटनेबाबत चौकशी केली असता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वास घेवून चौकशी केली असता त्यांने सागिंतले की, रात्री मी व पापा शंकर पवार, रा.लक्ष्मी पारधी पिडी तेरखेडा, आकाश देवीदास शिंदे, रा. पारा असे तिघांनी मिळून इंदापुर गावाचे पुढे रोडवरुन जाणारे चालत्या पिकअपमध्ये चढुन त्यामधुन 04 तेलाचे डब्बे काढले आहेत व ते माझे घरी आहेत असे सागिंतले. पथकाने 04 तेलाचे डब्बे एकुण 8 हजार 960 किंमतीचे, मोटरसायकल एकुण 63 हजार 960 रेडीऑन कंपनीची जिचा चेसी नं 62562701176 माल जप्त करुन नमुद तीन आरोपी पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी यांच्या ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अमंलदार रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.
