धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाकडून डॉ. मारुती लोंढे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरची अर्थशास्त्र विषयातून पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुनील मोहिते, प्रा.सचिन चव्हाण,साहित्यिक डॉ.अरविंद हंगरगेकर आदींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कनिष्ठ विभागातील गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रा. सुनील मोहिते म्हणाले की, डॉ. मारुती लोंढे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे.शैक्षणिक क्षेत्रामध्ये खुप मोठी भरारी घेतलेली आहे. यापुढे देखील त्यांची अशीच प्रगती व्हावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुर्यवंशी यांनी देखील अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.मारुती लोंढे यांनी सत्काराबध्दल सर्वांचे आभार मानले.


 
Top