धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव एस.टी. आगारामध्ये चालक व वाहक यांच्या रिक्त जागांच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या अडचणींवर प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने मात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आगारात 172 चालक व 193 वाहक कार्यरत असले आहेत. मात्र, त्यापैकी 20 ते 22 चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत विलंब होत होता. अडचणीवर मात करण्यासाठी चालकांच्या ॲडजस्टमेंटसाठी संपर्क साधून कोण कुठे ड्युटी करणार ? याची खातरजमा करावी लागत असल्यामुळे बुकिंग उशिरा पूर्ण होत होते. परंतू, आता ही प्रक्रिया नियमित व सुरळीत करीत दररोज दुपारी 12 वाजेपर्यंत बुकिंग पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


 
Top