परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषदचे समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांनी सभापती श्री. कोकणे यांचा फेटा बांधून व शाल व पुष्पहार देऊन सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, शिवाजीराव पाटील, सोशल मिडिया तालुका संयोजक तुषार नेटके, सनी अहिरे, नागेश मिसाळ तसेच खामसवाडी येथील भाजपा नेते अनिल शेळके, सादिक सय्यद,राजेश गरड आदी उपस्थित होते.
कसलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पक्षाने उमेदवारी आणि सभापतीपदाची मोठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार व्यक्त केले. विश्वास कोकणे यांचा असलेला जनसंपर्क, कार्य आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे ते जिल्हा परिषदेत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आणि लोकाभिमुक पारदर्शी कारभार करून समाजकल्याण विभागाच्या असलेल्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास व्यक्त केला. कोकणे यांनीही ठाकूर यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
