धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्यातील धाराशिव, लातुर, सोलापुर, बीड आणि अहिल्यानगर व कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली मराठवाडयातील एकमेव बहुराज्यीय नागरी सहकारी बैंक जनता सहकारी बैंक लिमिटेड, धाराशिव साल सन 1933 पासुन ग्राहकाच्या सेवेत कार्यरत असुन बँकेस 93 वर्षाची परंपरा आहे. बँकेच्या यापुर्वी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकुण 30 शाखा कार्यरत होत्या, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार बँकेने दिनांक 27.03.2026 रोजी खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर व वलांडी, ता. देवणी, जि. लातुर शाखेचा व दिनांक 30.03.2026 रोजी शाखा कमलनगर, ता. कमलनगर, जि. बिदर (कर्नाटक) व लोहारा, ता. लोहारा, जि. धाराशिव या नविन 4 शाखेच्या विस्तारासह बँकेच्या दिनांक 31.03.2026 अखेर महाराष्ट्र राज्यामध्ये धाराशिव, लातुर, सोलापुर, बीड व अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये 31 शाखा व कर्नाटक राज्यामध्ये बिदर या जिल्ह्यामध्ये 3 शाखा अशा एकुण 34 शाखेसह बँक व्यवसाय करत आहे.

बँकेचा शाखा विस्तार संचालक मंडळाच्या विस्तारवादी धोरणानुसार बँकेच्या सध्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये शाखा विस्तार बऱ्याच वर्षानंतर झालेला असुन या पुढे 7 वर्षानंतर बँकेला 100 वर्षे पुर्ण होत असुन बँक शतक पुर्ती पर्यंत 100 शाखा विस्तार करण्याचा मनोदय मा. अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे यांनी व्यक्त केला. ही बाब बँकेच्या वैभवात भर टाकणारी आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष वसंत संभाजीराव नागदे, उपाध्यक्ष वैजिनाथ ग्यानदेवराव शिंदे, सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय श्रीरंगराव घोडके व बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातुन बँकेचे सभासद, खातेदार व हितचींतकाकडून अभिनंदन केले जात आहे.

 
Top