भूम (प्रतिनिधी)- संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग चालू आहेत. यापैकी भूम येथ झालेल्या कार्यशाळेचा पहिला अहवाल महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कौडगे यांच्याहस्ते धाराशिव येथे सादर व प्रकाशित केला.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक मंडळात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान चालू आहे. या अभियाना दरम्यान सात ते आठ सत्रामध्ये विविध विषयावर विविध अभ्यासू वक्ते अनमोल मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करत आहेत.
या अभियाना अंतर्गत भूम येथे झालेल्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा अहवाल कवी मनाचे पत्रकार तथा पक्षाचे भूम तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर यांनी संकल्पीत व लिखित केलेल्या अहवालाचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कौडगे यांच्या हस्ते प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या दरम्यान मतदार यादी पुर्ननिरीक्षण परंडा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जेष्ठ नेते सहकारी अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस साहेबराव घुगे, जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य प्रदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, भूम तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, पत्रकार शंकर खामकर, चंद्रकांत गवळी, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.
