धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोणत्याही मंडळांनी डीजे बुकिंग करू नये, असा गर्भित इशारा धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक कुमार दराडे यांनी दिला आहे. शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये वेळोवेळी शांतता समितीच्या बैठका घेण्यात येत असून त्यामध्ये प्रामुख्याने डीजे बंदी यावर चर्चा करण्यात येत आहे. सर्व उत्सव मंडळांना स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच ही कारवाई केली जात आहे. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली.

 
Top