धाराशिव(प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बी.ए द्वितीय वर्षात शिकत असणारी निकिता बाळासाहेब शिंदे या विद्यार्थिनीची नुकतीच पोलीस भरतीमध्ये निवड झाली या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ते म्हणाले की, यश प्राप्ती साठी प्रयत्नांमध्ये सातत्य असणे, नियोजन बद्ध पध्दतीने अभ्यास करणे व समर्पण भावनेने स्वतःला गुंतवून ठेवणे आवश्यक आहे तरच अपेक्षित यश प्राप्ती होते. भविष्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयात सुरू करण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सदर प्रसंगी डॉ सी आर दापके, डॉ केशव क्षीरसागर, डॉ बालाजी गुंड, डॉ निल नागभिडे, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे, प्रा माधव उगिले, प्रा विवेकानंद चव्हाण, प्रा. गेंजगे, डॉ दत्तात्रय साखरे, डॉ मारुती लोंढे यांची उपस्थिती होती.

 
Top