परंडा  (प्रतिनिधी)- आर. बी. ग्रुप व नालंदा समुह आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर प्रतिक सिद्धार्थ बनसोडे तर उपाध्यक्षपदी अजय बनसोडे यांची निवड करण्यात आली.

जयंती समारोह समितीचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मा.जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राहुल बनसोडे आणि नगरसेविका तथा सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ.रत्नमाला राहुल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आली.

निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे, खजिनदार रुपेश बनसोडे, गणेश मदने, सह खजिनदार- अभिजित नलवडे, सचिव - हर्षवर्धन पाटील, प्रशांत मदने, सह सचिव - सुजित कांबळे, सुजित सोनवणे, सरचिटणीस ॲड. ऋषिकेश बनसोडे, अनिकेत गोंजारे, विजय दनाने, रणजीत काळे, सिद्धांत वाघमारे, रणजीत नागटिळक,  संघटक- घनश्याम शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, जिवन बनसोडे, शंकर बनसोडे , महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे, संजय बनसोडे, अविनाश बनसोडे,  कार्यकारिणी सदस्य - सोहम बनसोडे, यश शिंदे, अजय सरवदे, सुजित सोनवणे, रोहित कांबळे, वैभव ओहाळ ,ऋषिकेश फले आदींचा समावेश करण्यात आले.

 
Top