तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पुर्णाहुतीने यज्ञाची सांगता झाली.

भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद , भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे होते.संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती,आभा(ऑरा),पंचकोशीय शुद्धी,भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.अत्यग्निष्टोन सोमयाग यज्ञाची सांगता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पुर्णाहुतीने करण्यात आली.यावेळी भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्ऊ पुणे चे अध्यक्ष प्रा.क्षितीज पाटुकले, वेदमूर्ती धनेश जोशी,हभप कैलास महाराज दिवाणे, भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नरहरी बडवे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top