धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रतिवर्षीप्रमाणे धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे ठाणे हे फुले आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि तो फोडण्याचा मार्ग या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अरविंद गोरे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव हे भूषवणार आहेत.

दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी योगीराज बागुल ज्येष्ठ विचारवंत मुंबई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी या विषयावर विचार व्यक्त करून व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. प्रदीप रोडे नालंदा फाउंडेशन बीड हे भूषवणार आहेत. जगाने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखणाऱ्या व पुस्तकासाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती वैचारिक प्रबोधनात्मक रितीने साजरी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच धाराशिव यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला नालंदा फॅशन डिझायनिंग गोरे कॉम्प्लेक्स विसर्जन विहिरीजवळ धाराशिव येथे सायंकाळी  6.30 वाजता संपन्न होणार आहे. धाराशिवकरांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे यांनी केले आहे.


 
Top