उमरगा (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांनी उपनगराध्यक्ष विजय वाघामारे यांची नगरपालिका कार्यालयात भेट घेतली. यावेळी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, नविन पाणीपुरवठा योजना व बंदिस्त गटारीचे कामाची माहिती घेण्यात आली. शहराच्या विविध विकास कामाबाबत चर्चा झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे, नगरसेवक अभिजित मोरे, नरसेवक बाबा मस्के, नगरसेवक सचिन जाधव, विक्रम बापू बिराजदार, दत्ता चिंचोळे, प्रफुल्ल गायकवाड, बालाजी मिसाले, इम्रान शेख, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते.
