धाराशिव (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपुर येथे शनिवार संगीत मंडळाच्यावतीने नरसिंह दरबारात शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, भावगीत सादर केले. बापू देशपांडे- सगुण म्हणा की निर्गुण रे, स्मरा हो दिगंबराशी स्मरा, सिद्धेश्वर जोशी- टाळ बोले चिपळीला, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, विलास धर्म- नाम घेता तुझे गोविंद, निलंगेकर- पाऊले चालती पंढरीची वाट, अरुण जोशी - राग शंकर बंदिश देवाघरचे ज्ञात कुणाला, पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, शेवटी सर्वांनी मिळून सर्वात्मका सर्वेश्वरा सादर केले. त्यावेळी तबलासात पांडुरंग देशपांडे व हार्मोनियमची साथ भागवत कुंभार यांनी केली मंदिर संस्थानच्यावतीने पी. डी. देशपांडे व अरुण जोशी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रोते उपस्थित होते.
