धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मार्फत दिनांक 09 मार्च ते 07 एप्रिल  या कालावधीत धाराशिव तालुक्यातील एकूण- 225 शाळांचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सोसायटी कडून नियुक्त करण्यात आलेल्या साधन व्यक्ती मार्फत प्रत्येक शाळेत जाऊन समग्र शिक्षा संदर्भात असणारे सर्व अभिलेख्यांची पडताळणी केली तसेच तेथे भौतिक सुविधाची पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी पुरेसे फर्निचर , मुलींसाठी पुरेशी वेगळी शौचालये, शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, विद्युत उपकरणे, खेळाचे मैदान, शाळेची इमारत सीमा भिंत किंवा कुंपण द्वारे सुरक्षित, खेळ आणि क्रीडा उपकरणे, शिक्षण साहित्य, डिजिटल पायाभूत सुविधा, औषध पेटी/प्रथमोपचार संच, पाहणी करण्यात आली. त्यांचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती च्या बैठकीमध्ये त्या अहवालाचे वाचन करण्यात आले.

अंकेक्षण प्रक्रियेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावर दिनांक 20 एप्रिल रोजी कन्या प्रशाला धाराशिव येथे जणसुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीत सर्व 225 मुद्द्याचे वाचन करून त्यावर पॅनलने योग्य असे निर्णय दिले. यामध्ये गटशिक्षण अधिकारी आसरार, सामाजिक संस्था प्रतिनिधी लोमटे, बचत गट प्रतिनिधी धायगुडे मॅडम, तसेच जिल्हा साधन व्यक्ती सुशील थोरात यांनी कामकाज पहिले. या सुनावणीसाठी गटशिक्षणाधिकारी संबंधित  केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व नितीन इंगळे, खंडू आल्ठे, शरद पवार, इतर साधन व्यक्ती उपस्थित होते.

 
Top