तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत वसंत कांबळे यांनी ग्रामपंचायत कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून दोन दिवसीय लाक्षणिक  उपोषण गुरुवार दिनांक 16 पासून सुरू केले आहे  

 सन 2023 पासून आजतागायत ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांद्वारे प्राप्त झालेल्या निधीचा तपशील व खर्चाचा हिशोब स्पष्टपणे उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा माहिती मागवूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच  ग्रामनिधी जमा-खर्च व शिल्लक रकमेचा तपशील, 15 वा वित्त आयोग निधीचा उपयोग, दलित वस्ती सुधार योजनेतील निधी, तांडा सुधार योजनेतील कामे,स्वच्छता अभियानांतर्गत खर्च, अनुसूचित जाती व भटक्या-विमुक्त जातींसाठी मिळालेला निधी, सर्व कामांचे जीओ-टॅग फोटो व नोंदी आधी मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे या उपोषणात ग्रामस्थ ही सहभागी झाले आहेत. 

 
Top