परंडा (प्रतिनिधी)- संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र  अक्षय सुरेश डोके यांनी मिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM) चे गणितीय मॉडेलिंग आणि प्रायोगिक तपासणी या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास चालना मिळणार आहे.

ही संशोधन पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे  संलग्न राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  पुणे येथील संशोधन केंद्रातून पूर्ण केली. त्यांच्या संशोधनासाठी डॉ. ए. एम. बडधे, डॉ. एन. एस. मुजुमदार आणि प्रदिप दिक्षीत (इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले. अक्षय डोके यांच्या संशोधनामध्ये इलेक्ट्रो केमिकल डिस्चार्ज मेकॅनिंग (ECDM) प्रक्रियेचे गणितीय मॉडेलिंग व प्रायोगिक विश्लेषण करण्यात आले असून, बोरोजिलिकेट ग्लासवर मिश्र इलेक्ट्रोलाइट्सच्या वापराचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग मायक्रो - इलेक्ट्रो - मेकॅनिकल सिस्टम उपकरणांमध्ये सूक्ष्म घटक विकसित करण्यासाठी होणार असून, यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाच्या प्रगतीस चालना मिळणार आहे. अक्षय हा शिवसेनेचे राहूल डोके याचा भाऊ तर  मुंद्राक विक्रेता सुरेश दादा डोके याचा मुलगा आहे या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top