धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विज्ञान अध्यापन करणारे सहशिक्षक केशव काशिनाथराव पाटील (बणजगोळे) बावची विद्यालय परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ यांच्या वतीने डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान
शिक्षक पुरस्कार - 2026 पुरस्काराने जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव डॉ. दयानंद जटनुरे यांचे हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी माळी, अविज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या पुरस्कारा बद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे,उपमुख्याध्यापक प्रमोद कदम विज्ञान विभाग प्रमुख संतोष देशमुख पर्यवेक्षक यशवंत इंगळे,बी.बी. गुंड, सुनिल कोरडे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे तसेच सहकारी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर वृंद, मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
