तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर येथे सोमवार, दि. 06 एप्रिल रोजी एक उल्लेखनीय प्रामाणिकतेचा प्रकार घडला.

भाविक श्री. विनायक रवींद्रनाथ आदम ( जि. ठाणे) हे देवीजींच्या दर्शनासाठी आले असता त्यांची पर्स हरवली. सदर पर्स प्रशासन कार्यालयासमोर होमगार्ड जवान श्री. पवार यांना आढळली. त्यांनी तत्परता दाखवत संबंधित पर्स सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्वरित दर्शन मंडप नियंत्रण कक्ष येथे जमा केली.

यानंतर संबंधित भाविकांची ओळख पटवून पर्स त्यांना सुरक्षितरित्या परत करण्यात आली. सदर पर्समध्ये अंदाजे रु. 10,330/- रोख रक्कम तसेच परदेशी चलन व महत्त्वाची कागदपत्रे होती. होमगार्ड जवान श्री. पवार व सुरक्षारक्षकांच्या या प्रामाणिक व जबाबदार कृतीबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.

यावेळी सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर तसेच  सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व कमलाकर पवार उपस्थित होते.

 
Top