उमरगा (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार प्रवीण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोवण्याची सुचना आमदार स्व्ाामी यांनी दिल्या.
राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आमदार प्रवीण स्वामी यांनी सोमवारी (दि.6) कामकाजाचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णालयातील कारभारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदारांनी प्रशासनाला दिले. शासनाच्यावतीने अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ तळागाळातील प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचला पाहिजे. रुग्णालयातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील राहावे, जेणेकरून उमरगा तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयातील स्वच्छता राखणे व रुग्णांना औषध उपलब्ध करणेबाबत सुचेना दिल्या. रुग्णालयातील सेवा-सुविधांचा दर्जा सुधारून सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळावेत, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी रुग्णालयात अनेक समस्या आहेत. यामध्ये आयसीयू विभाग तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेला नाही. या संदर्भात बोलताना आमदार स्वामी म्हणाले की, आयसीयू विभाग कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित अनुभवी स्टाफ आणि किमान दोन तज्ज्ञ फिजिशियन डॉक्टरांची तातडीने गरज आहे. या पदांच्या भरतीसाठी वरिष्ठ स्तरावर आणि शासन दरबारी पाठपुरावा करून या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील, पंचायत समिती सदस्य हरी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ कोमल जाधव, महावीर कोराळे, जगदीश सुरवसे, दत्ता शिंदे आदीची उपस्तीथी होती.
