येरमाळा  (प्रतिनिधी)- येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवी यात्रेदरम्यान पालखी डोंगराकडे जात असताना झालेल्या गोंधळाच्या प्रकारात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

येरमाळा येथील येडेश्वरी देवी ही तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळे दरवर्षी यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त पालखी गावातून डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असताना 7 एप्रिल रोजी सायंकाळी संबंधित प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 
Top