परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंभेजा शिवारात एका घरावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शुकवार दि.24 एप्रिलच्या मध्यरात्री घडली. यावेळी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिक विश्वनाथ जगताप (वय 70 वर्ष ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे दि.24 एप्रिलच्या मध्यरात्री कुंभेजा शिवारात विश्वनाथ जगताप यांच्या घरावर अंधाराचा फायदा घेत अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी झालेल्या मारहाणीत विश्वनाथ जगताप हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम उपचार म्हणून उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर बार्शी येथे दाखल केले असता गंभीर घाव असल्याने त्यांना तात्काळ पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेआहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चोरमोले सह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पीएसआय सुर्वे हे करीत आहे.
