धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने पुणे येथे आयोजित वरिष्ठ (महिला/पुरुष)गट स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे रविवार दि.10 ते 11 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये 100मी ,200मी, 400मी ,800मी,1500मी,5000मी,10000मी,3000मी स्टीपलचेस,लांब उडी ,उंच उडी,बांबू उडी,गोळा फेक,थाळी फेक,भाला फेक,हातोडा फेक,4 X100मी रिले,4 X 400 रिले व 20 किमी चालणे इत्यादी या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमधून विजयी खेळाडू (महिला/पुरुष)ची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सोळा वर्षे पूर्ण झालेले खेळाडू सहभागी होऊ शकतात, सहभागी खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत),10वी प्रमाणपत्र(सनद),  सोबत आणावे.यासाठी राजेंद्र सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले,मुनीर शेख, राहुल जाधव,ज्ञानेश्वर भुतेकर,अजिंक्य वराळे यांची तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सचिन पाटील,रोहित सुरवसे,प्रशांत बोराडे,ऋषीकेश काळे,अश्विन पवार हे आहेत.स्पर्धा प्रमुख म्हणून श्री संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. यास्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले (9860609056),माऊली भुतेकर(9404193674),रोहित सुरवसे(7796756866)यांच्याशी संपर्क साधावा.


 
Top