धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवानिमित्त सारोळा बु येथे आयोजित बैठकीत भीम जयंती उत्सव समिती 2026 च्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या बैठकीत यंदाचा भीम जयंती उत्सव शिस्तबद्ध, वैचारिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन शेषेराव कठारे, उपाध्यक्षपदी अमोल प्रल्हाद सावंत, सचिवपदी विकी सुभाष फडके तर कोषाध्यक्षपदी विश्वनाथ तुकाराम कठारे यांची निवड करण्यात आली. तसेच राकेश अमोल कठारे, संतोष जीवन सोनवणे आणि प्रशांत सुरेश गोरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून यावर्षीचा भीम जयंती उत्सव अत्यंत शिस्तबद्ध, वैचारिक आणि भव्य स्वरूपात साजरा होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी प्रमोद कठारे, सतीश गायकवाड, दत्ता कठारे, सुरेश कठारे,अमोल मु कठारे, सुरेंद्र विधाते, बाळासाहेब कठारे,संदीप कठारे,अमोल सु कठारे, दत्ता कठारे, सोपान कठारे, तुकाराम वाघमारे, विशाल वाघमारे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

 
Top