धाराशिव (प्रतिनिधी)- येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे भाजपा चा 46 वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला. आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थीती होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी प्रत्येक बुथवर उद्योजक तयार करण्याच्या संकल्प केला आल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश देशमुख, नितीन काळे, ॲड. अनिल काळे, नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, अस्मिता कांबळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रितीताई कदम हे मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक बुथवर एखादा तरी छोटा मोठा उद्योजक तयार करण्याचा संकल्प यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. 46 वर्षामध्ये पक्ष संघटनेच्या अनेक मान्यवरांनी आपल्या त्याग, परिश्रम व अथक प्रयत्नातून पक्षाचे विचार तळागळात पोहचवण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपण जिल्ह्यात, प्रदेशात व केंद्रात सत्तेवर आहोत,असे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी विचार मांडले. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व भागांतील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
