धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा चालक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी (14 एप्रिल) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष नेहा काकडे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, आरपीआय नेते राजाभाऊ ओव्हाळ, नगरसेवक अमित शिंदे, संघटनेचे अध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, अभिजीत काकडे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सुशांत सोनवणे,प्रवीण शिरसाटे, नगरसेवक अक्षय जोगदंड,हर्षद देशमुख,पृथ्वीराज सरवदे, ऍड.राजहंस शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, नगरसेवक खलिफा कुरेशी, नगरसेवक आयाज बबलू शेख, पंकज भोसले, शुभम सुकाळे,संदीप बनसोडे, राजाभाऊ बनसोडे, शामराव बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष सतीश बाबुराव ओव्हाळ, उपाध्यक्ष दत्तात्रय विठ्ठल वाघमारे, सचिव आकाश भारत खंडागळे, मार्गदर्शक उत्तम घरबुडवे, सुधाकर लष्करे, संयोजक सुशांत वसंतराव बनसोडे, किशोर गायकवाड, अनुप सोनवणे, किशोर सरवदे, लक्ष्मण वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
