भूम (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर मधील भूपालसिंह गायकवाड सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता टीइटी परीक्षेत पहिली ते पाचवीसाठी असलेला पेपर एक व सहावी ते आठवी साठीचा पेपर दोन पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. बुद्धीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणले आहे.
याबद्दल त्यांचा श्री गुरुदेव दत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वतीने शाळेच्या प्रांगणात हजारो विद्यार्थी,पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक माधव भोसले, राजेश भोरे, पर्यवेक्षक पोपट बांगर, लातूर बोर्ड मेंबर किरण जाधव यांचे शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षव्यंकटराव मोटे, उपाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतिश देशमुख, संचालक सत्येंद्र मस्कर, सिद्धेश्वर मनगिरे,मुख्याध्यापिका अंजना मुंढे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप दहिफळे यांनी केले.
