धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शिवाई प्रतिष्ठान यांच्यावतीने श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.स्क्रीनकडून वाचन लिखान संस्कृतीकडे. या उपक्रमांतर्गत शिवाई प्रतिष्ठान धाराशिवच्या महिलांनी एकत्रित येऊन श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील 120 विद्यार्थ्यांनां छोट्या वह्ंयाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना सुट्टी मध्ये वाचण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप केले. श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या ग्रंथालयातून करण्यात आले. इ 5 वी ते पुढील  विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोष्टींची व अभ्यासात्मक पुस्तके वाचतील आणि आपण काय वाचलं कोणतं पुस्तक वाचले या संदर्भामध्ये त्या त्या वेळी वही मध्ये थोडक्यामध्ये नोंद करून ठेवतील. हा उपक्रम एकाच वेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याचे समाधान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिवाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका माजी प्राचार्या डॉ. सुलभा देशमुख , अध्यक्षा शोभा घोडके, सचिव डॉ.विद्या देशमुख, उपाध्यक्षा डॉ. स्मिता कोल्हे, सहसचिव अस्मिता देशमुख, माधुरी कोकाटे, आशा पाटील, जयश्री भोसले आदि मान्यगण सदस्या उपस्थित होते. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर डॉ. सुलभा देशमुख यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपण जर वाचनाची सवय ठेवली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आपण अनेकांचे जीवन समजून घेऊ शकतो. सुसंस्कृत जीवन घडवण्यासाठी  वाचनाचा   नक्कीच फायदा होतो असे सांगितले. 

विविध माध्यमांच्या आपल्या वरती होत असलेल्या आक्रमणामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची सवय कमी झालेली आहे . त्या दृष्टीने हा अनोखा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. असे सर्व  शिक्षकांनी बोलून दाखवले. शालेय विद्यार्थ्यांनी पण खूप आवडीने वाचनासाठी पुस्तक घेतली. आणि भरपूर पुस्तकं सुट्टी मध्ये  वाचणार आणि बक्षी से मिळवणार असा आत्मविश्वास व्यक्त केला. या उपक्रमा प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम 8 वी पर्यवेक्षक कुमार निकम शिक्षकशिक्षिका वृंद उपस्थित होते.

 
Top