तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील युवा उद्योजक आणि शिव रियालिटी चे संचालक दिनेश अग्रवाल यांनी सोलापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रीमियम प्लॉटिंगची वेगळी ओळख निर्माण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
सोलापूर येथे पार पडलेल्या पावर कॉन्फरन्स 2026 कार्यक्रमात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सिने अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्तिकीयन, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिनेश अग्रवाल यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर नंतर यांनी नियोजनबद्ध प्रोजेक्ट्स, उत्कृष्ट लोकेशन्स आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ग्राहकांचा ठाम विश्वास जिंकला आहे. अल्पावधीत त्यांनी उभारलेले प्रकल्प सोलापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळी छाप पाडत आहेत. याची दखल घेऊन हा पुरस्कार दिनेश आगरवाड्यांना देण्यात आला आहे.
या पुरस्कारानंतर तुळजापूरसह सोलापूर परिसरातील उद्योग क्षेत्रातून दिनेश अग्रवाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकून मिळवलेले यश हेच या सन्मानामागील खरे कारण असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. दिनेश अग्रवाल यांच्या या यशामुळे तुळजापूरच्या उद्योजकतेला नवी ओळख मिळाली असून, युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. भविष्यातही ते अशाच यशाची शिखरे सर करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
