धाराशिव (प्रतिनिधी)- सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणने सोमवार ( दि.20 एप्रिल ते 22 एप्रिल) पासून उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे. नवीन सौर कृषीपंपासाठी कसा अर्ज करायचा यासाठी तसेच सौर कृषीपंपाबाबत तक्रार असलेल्या लाभार्थ्यांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
धाराशिव शहर व ग्रामीण उप विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी तसेच कळंब उपविभागातील लाभार्थ्यांसाठी सोमवारी (दि.20 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. त्याचबरोबर तेर, वाशी, भूम व परंडा उप विभागातील लाभार्थ्यांसाठी मंगळवारी (दि.21 एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. तसेच तूळजापूर विभागांतर्गत येणाऱ्या तूळजापूर, लोहारा, उमरगा व नळदुर्ग उपविभागातील लाभार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 22 एप्रिल) उपविभागीय कार्यालयात तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे.
दिनांक 20 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजीत तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. सौकृषीपंपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.