भूम (प्रतिनिधी)- येथील तालुका क्रीडा संकुल येथे धाराशिव जिल्हा कबड्डी असोशिएशन व स्वराज स्पोर्टसच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 5 वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस  25 हजार रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता भोरे यांच्या वतीने, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये बाजार समिती संचालक विशाल ढगे यांच्या वतीने,तृतीय पारितोषिक 11 हजार  रुपये उद्योजक भाऊसाहेब मारकड यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य म्हणून उद्योजक बालाजी काळे यांनी 11 हजार रुपये दिले आहेत. या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील संघाना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील कबड्डी खेळाला व नवीन खेळाडूंना संधी मिळावी,तसेच प्रोहत्सान मिळावे यासाठी यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मराठवाडा विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा डॉ आप्पासाहेब हुंबे यांनी सांगितले. या स्पर्धेत जिल्हातील अधिक अधिक संघानी सहभाग घेण्याचे आवाहन ओसेशिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते,सहकार्य वाहक बळीराम साठे यांनी केले आहे.

 
Top