धाराशिव (प्रतिनिधी)-  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील महात्मा फुले चौक येथे आयोजित कार्यक्रमात धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या शुभहस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, सामाजिक कार्यकर्ते महादेव माळी, दत्ता माळी, रविकांत गोरे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंतीनिमित्त परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी फुले यांच्या कार्याला अभिवादन करत समाजात समानता व शिक्षणाचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.


 
Top