भूम (प्रतिनिधी)- येथील कसबा विभागातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून उद्या, गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात कर्नाटक-हुबळी येथील किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कृष्णेंद्र वाडीकर आपली कला सादर करणार आहेत. रात्री 9:30 वाजता सुरावटींचा प्रारंभ श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी गायन क्षेत्रातील दिग्गज कलाकार कृष्णेंद्र वाडीकर यांच्या सुश्राव्य गायनाने ही मैफल सजणार आहे. गुरुवारी रात्री 9:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.दिग्गज कलाकारांची साथसंगत या संगीत मैफिलीला साथसंगत करण्यासाठी नावाजलेले वादक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तबला साथ हनुमंत फडतरे संवादिनी (पेटी) साथ: सुरेश फडतरे पखवाज साथ असाराम साबळे रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारे आणि किराणा घराण्याची गायकी प्रभावीपणे मांडणारे वाडीकर यांच्या गायनाचा आनंद घेता यावा, यासाठी भूम शहर व परिसरातील संगीत प्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समिती, श्रीराम मंदिर (कसबा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top