तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव- तुळजापूर रोडवरील उड्डाणपुलावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी वातावरण तापले असून, पीडिताच्या पत्नी व मुलीने आरोपींवर कलम 307 (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

20 मार्च 2026 रोजी सकाळी धाराशिव तुळजापूर बायपास उड्डाणपुलाजवळ काहीनी शिवाजी हावळे  यांच्यावर हल्ला करण्यात आला होता यात  पीडिताच्या पत्नी व मुलीने हा सरळ खूनाचा प्रयत्न आहे. आरोपींवर 307 कलम लावून त्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. अशी मागणी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top