उमरगा (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे उमरगा व परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सेवांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या सेवेची माहिती घेण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी व उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पहाणी केली.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून रुग्णांची मनापासून सेवा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी ते सदैव तत्पर आहेत. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांना आता मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होऊन, स्थानिक पातळीवरच तपासणीची सुविधा मिळणार आहे. शासनाच्या वतीने आरोग्यविषयक विविध योजना राबवल्या जात आहेत. क्रस्ना डायग्नोस्टिक सी.टी. स्कॅन सेंटर सुरु करण्यात आले आहे. याची पहाणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार प्रविण स्वामी, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचे विधानसभा सह अध्यक्ष शरण बसवराज पाटील, मुरलीधर मुगळीकर, डॉ. कपिल महाजन, डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. थिटे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. विकास जाधव, डॉ. सौ. कोमल जाधव, अजिंक्य पाटील, प्रकाश आष्टे, सुनिल कुलकर्णी, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, पंचायत समिती सदस्य दगडू मोरे, हरीभाऊ जाधव, यशपाल कांबळे, धिरज बेळंबकर, महेश माशाळकर, मल्लिनाथ स्वामी, राजेश सोनवणे, सदानंद पाटील आदीसह डॉक्टर संघटना, कर्मचारी वर्ग, ग्रामीण भागातील युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
