धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची निर्मिती व्हावी या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 चे आयोजन संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडत आहेत.

धाराशिव जिल्यातील संघटनात्मक 19 मंडळा पैकी 12 मंडळांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले .या प्रशिक्षण वर्गास 12 मंडळातून सुमारे 1680 हून अधिक जेष्ठ, युवा, महिला भगिनी प्रशिक्षित झाल्या आहेत. या वर्गांमध्ये वैचारिक अधिष्ठान, भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि विस्तार, पक्ष संघटन विस्ताराची दृष्टी, पक्षाची कार्यपद्धती, आपल्या सरकारची कामगिरी, सोशल मीडिया आणि AI  तसेच नमो ॲप आणि सरल ॲप, बूथ व्यवस्थापन, मन की बात या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण महा अभियाना मध्ये 19 मंडळापैकी 12 मंडळामध्ये शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून, उर्वरित मंडलांमधील वर्गांचे पण लवकरच पूर्ण होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.


 
Top