तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील प्रसिद्ध श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून, यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा रमेश काळे (वय 65, रा. माळी नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दि. 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी त्या छत्रपती शहाजी महाद्वारासमोर उभ्या असताना अज्ञात महिलांनी त्यांच्या व साक्षीदारांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 61 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी रेखा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
