भूम (प्रतिनिधी)-  श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमधील सहशिक्षक राजाराम उत्तरेश्वर कोळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त आज शाळेत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोळी सरांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श. भोसले यांच्या हस्ते कोळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सतीश देशमुख, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माधव भोसले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना मुंडे यांच्यासह किरण जाधव, विठ्ठलराव दहिटणेकर, आबासाहेब ढगे, आप्पा मिसाळ, पोपट बांगर, लक्ष्मण घुले, आलम मुलाणी, चंद्रकांत तांबे, संतोष राऊत, सूर्यकांत वाळजे, महेश बोरकर, अंकुश परबळे, शेषेराव शेळके, शहाजी पाटील, संदीप बागडे, पल्लवी नवगिरे, पायल जिकरे, शिवानी गौड, रंधवे, भिमाबाई बांगर, कटारे, पूजा राठोड, यमुना क्षिरसागर, दीक्षा गाढवे, शामबाला बाराते, नायकिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कोळी यांच्या सेवाभावी वृत्तीचे, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे आणि शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. 


 
Top